मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची हेळसांड

293

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ०४ ऑक्टोबर : मुरुमगाव येथील गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून आल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप मुरुमगाव येथील गावकऱ्यांनी केला आहे.
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी मंगळवार ०३ आक्टोंबर २०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता निम्मे कर्मचारी रजेवर आढळले, तर काही कर्मचारी गडचिरोली येथून आवागमन करीत असल्यामुळे वेळेवर कर्तव्याला उपस्थित राहत नाही. त्यामुळे सकाळची ओपिडि ०८.०० वाजता न उघडता १०.३० उघडण्यात आली. तोपर्यंत रुग्णाला डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची वाट बघत ताटकळत राहावे लागते. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण सिरीयस असल्यास किंवा त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न गावकरी उपस्थित करित आहेत.
येथील नेत्रचिकित्सक संकेत लंपाटे यांचे मंगळवार व बुधवार असे दोन दिवस कर्तव्य असते परंतु ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भेट दिली असता त्यांच्या दालनाला कुलूप लागले होते. तसेच जी. एन. एम. वैशाली बजाईत या सुद्धा मागील दोन महिन्यापासून कर्तव्यावर हजर नाहीत. मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे येथील कार्यरत कर्मचारी यांची संख्या वाढविण्यात यावी, नेत्र चिकित्सक संकेत लंपाटे यांना नियमित करण्यात यावे,. येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल बनसोड हे सभेसाठी गडचिरोली येथे असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे या सर्व बाबीकडे आवर्जून लक्ष देऊन अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरळीत करावी, यापूर्वी संपूर्ण परिसरातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले होते त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे अशी मागणी केली होती ती पूर्ण करावी अशी मागणी सरपंच शिवप्रसाद गवर्णा, मथुराम मलिया माजी सदस्य मुनीर भाई शेख, सदस्या अंजू ताई मैदमवार, सदस्य राजू कोठवार, अभिजीत मेश्राम, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी मागणी केली आहे.
मुरुम गाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पुर्ण वेळ नेत्र चिकित्सक पद भरलेले असुन ते मुरुमगाव येथे फक्त मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसच हजर असतात बाकी दिवस दुसऱ्या दवाखान्यात असतात. त्यामुळे गावातील व परिसरातील रुग्णांना वेळोवेळी उपचार उपलब्ध होत नाही. या संबंधाने ग्रामपंचायत मुरुम गावच्या २९ सप्टेंबर २०२३ मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुरुमगावला पुर्णवेळ नेत्र चिकित्सक द्यावा. तालुका वैद्यकीय अधिकारी धानोरा यांना‌ ४ ऑक्टोबर २०२३ ला निवेदन देऊन सरपंचांनी पुर्णवेळ नेत्र चिकित्सक मुरुमगावला देण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here