The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१२ : तालुक्यातील रांगी येथे ग्रामपंचायतच्या वतीने शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी रांगी येथे ११ डिसेंबर रोजी संकल्प विकास यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फालेश्वरी प्रदिप गेडाम सरपंच रांगी, प्रमुख अतिथी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सिंग मँडम, शशिकांत साळवे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली, मुपिडवार मंडळ अधिकारी, सुरज हलामी उपसरपंच रांगी, नारायण हेमके, हेमंत कांटेंगे मुख्याध्यापक रांगी, दिलिप कांटेंगे, भुरसेझ शशिकला मडावी, अर्चना मेश्राम, जंवजाळकर तलाठी आदि मान्यवर उपस्थित होते.
यामधे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. प्रास्ताविकव आभारप्रदर्शन सचिव एम.डी.बांबोळे यांनी केले.