The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २३ : तालुक्यातील रांगी ते गडचिरोली तालुक्यातील बेलगाव या मार्गातील अंतर सहा किलोमीटर असून या मार्गाचे डांबरीकरण पूर्णपणे उघडले आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच तलावाच्या मध्यभागी बांधलेला पूल फुटला असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे. तरी संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन या मार्गाची वेळीच दुरुस्ती करून होणाऱ्या अपघाताला पाय बंद घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या मार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर भेगा पडलेले आहेत. पावसामुळे अनेक झाडे झुडपे रस्त्यावर वाकलेली आहेत. त्यामुळे तेथून वाहनधारकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .दत्त मंदिर ते मोहटोला फाट्याच्या मध्यंतरी मोरी बांधकाम असून बांधकाम खुप जुणा असल्याने अर्धा भाग खचलेला आहे. रोडला भेगा ही पडलेली आहे. या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. परिणामी या खड्ड्यामुळे या मार्गावर गेल्या काही दिवसापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. रांगी ते बेलगाव गडचिरोली या मार्गावर वाहनाची मोठी वर्दळ असते. गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनाची आवागमन सुरू असते. येथील विविध शासकीय कार्यालये, दवाखाना, बँक महाविद्यालय, खाजगी व व्यापारी कामाकरिता वेगवेगळ्या कामाने रांगी परिसरातील नागरिक व विद्यार्थी शिक्षणासाठी याच मार्गाने गडचिरोलीकडे ये जा करतात. मात्र या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करतात. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली नागरिकांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #gadchirolipolice )