कुरखेडा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कार्यप्रणाली विरोधात शहरवासीय आक्रमक

142

– शल्यचिकीत्सकाना दिले निवेदन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २८ मे : उपजिल्हा रुग्णालय कूरखेडा येथे मागील २५ वर्षापासून कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी ठाकर यांचा मनमानी, मूजोरी, बेजबाबदार तसेच सूडभावणापूर्ण वागणूकीने त्रस्त येथील सर्व पक्षीय शहरवासीयानी गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयात धडक देत वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमीत ठमके यांचाशी चर्चा केली व त्यांचाकडे डॉ. ठाकर यांचा मनमानी कार्यप्रणाली चा पाढा वाचत त्यांचा मार्फत जिल्हा शल्यचिकीत्सकाना निवेदन देऊन याबाबत चौकशी करीत तत्काळ त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.
डॉ संभाजी ठाकर बधीरीकरण तज्ञ आहेत असून रुग्णालयात सूसज्ज शस्त्रक्रीया गृह आहे. येथे नियमित प्रसूती शस्त्रक्रीयासह अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रीया पार पडतात. शस्त्रक्रीया प्रक्रीयेत बधिरीकरण तज्ञांची महत्वाची भूमीका असते, तपासणी करून फिटनेस प्रमाणीत केल्याशिवाय शस्त्रक्रीयेची पूढील प्रक्रीया होऊ शकत नाही याच बाबीचा ते नेहमी गैरफायदा घेत ते अनेक रुग्णांची अडवणूक करून बिपीचा त्रास आहे, रक्ताची कमतरता आहे अशी खोटी भीती दाखवत त्याना रेफर करीत खाजगी रुग्णालयात जाण्यास बाध्य करतात असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यांचा मनमानीचा पाढा वाचताना त्यानी शस्त्रक्रीयेकरीता विनंती करूनही नकार दिलेल्या रुग्णांची शस्त्रक्रीया त्याच दिवशी याच रुग्णालयात ब्रम्हपूरी येथील खाजगी रुग्णालयातील बधीरीकरण तज्ञ पाचारण करीत कोणत्याही अडचणी शिवाय यशस्वीपणे पार पडली तसेच अनेक रुग्णांची येथे शस्त्रक्रीया करणे शक्य असताना त्यानी आपली मनमानी चालविताना फिटनेस प्रमाणीत करण्यास नकार दिल्याने त्याना इतरत्र हलवावे लागले. तिथे शस्त्रक्रीया कोणत्याही जोखीमे शिवाय यशस्वीपणे पार पडल्या मात्र रुग्णांना अधिकचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सलग २५ वर्षापासून एकाच ठिकाणी ते सेवा बजावत असल्याने येथे त्यांचे हितसंबध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, काही हितसंबधी लोकांनाच ते सेवा देतात मात्र इतरा संदर्भात त्यांची वागणूक सौहार्द्रपूर्ण नाही त्यामुळे रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे करीता तातडीने त्यांची चौकशी करीत येथून हकालपट्टी करावी अन्यथा सर्व पक्षीय शहर वासीयाकडून उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढत वैद्यकीय अधिक्षकांचा दालनाला कूलूप ठोकण्यात येईल असा इशारा सूद्धा निवेदनात भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जिवन पाटील नाट, भाजपा तालुका अध्यक्ष नाजूक पूराम, जिल्हा नियोजन समीती सदस्य बबलू हूसैनी, माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी, भाजपा जिल्हा सचिव विलास गावंडे, माजी प स सभापती गिरीधर तितराम, उपसभापति मनोज दूनेदार, भाजपा ता महामंत्री तथा नगरसेवक ऍड. उमेश वालदे, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, तालुका महिला कांग्रेस अध्यक्ष आशाताई तूलावी, उल्हास देशमुख कांग्रेस ता उपाध्यक्ष शोएब मस्तान, नगरपंचायतचे आरोग्य सभापती अतूल झोळे, उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समीती सदस्य सिराज पठान, विवेक निरंकारी नगरसेवक सागर निरंकारी, अलका गिरडकर कांग्रेस अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष जावेद शेख भाजयुमो चे तालुका अध्यक्ष प्रा विनोद नागपूरकर, यूवक कांग्रेस शहर अध्यक्ष रोहित ढवळे, राष्ट्रवादीचे पूरषोत्तम मडावी, नाजूक दखने,माजी नगरसेवक उसमान पठान, सादीक शेख, वैभव बंसोड, माजी सरपंच संजय कोरेटी, रितेश मनूजा, मधूकर वारजूरकर,पंकज टेभूंर्णे,न्याज सय्यद,अरशद खान व शहर वासीयानी दिला आहे

२०२० मध्येही अशा प्रकारे अरोप करण्यात आले होते. विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी फिटनेस ठरविली जाते. त्यासाठी फिजीसीयन व भुलतज्ञ हे त्याची फिटनेस ठरवितात. तर या रूग्णालयातील फिजीशियन व जनरल सर्जन हे सामान्य रूग्णाल गडचिरोली येथे डॉक्टरांची कमी असल्याने डयुटीसाठी जातात व या रूग्णालयात त्यांचे मोजकेच वास्तव्य असते. या रूग्णालयात अत्यवस्थ रूग्णांना तात्काळ उपचार देण्यासाठी अतिदक्षता विभाग नाही त्यामुळे अति जोखमिच्या शस्त्रक्रिया अशा छोटया रूग्णालयात करणे रूग्णाच्या जीवावर बेतु नये यासाठी अशा शस्त्रक्रिया करणे टाळणे हे हेच माता, बाल व नवजतात मृत्यू टाळण्याची पर्यायी व्यवस्था असु शकते. यामागे कुठलेही सुडभावनेचे कारण मुळीच नाही. यापुर्वी या रूग्णालयात रूग्णांचे शस्त्रक्रियेमुळे जिवितहानी झालेली मी पाहिलेली आहे. मी कुळल्याही शस्त्रक्रियेच्या रूग्णास सेवा देण्यास नकार दिलेला नाही. २०१८ मध्ये उपजिल्हा रूग्णालया तिरोडा जि. गोंदिया येथे पदस्थापना झाली होती. आमदार कृष्णाजी गजबे व अन्य लोकप्रतिनिधींनी स्वत: वयक्तिक इच्छा प्रगट करून सदर पदस्थापना रद्द करून माझी पुन्हा पदस्थापना कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात करवून घेतली.
-डॉ. संभाजी ठाकर
वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा.

(the gdv, the gadvishva, kurkheda, gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here