दिना धरणाच्या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करा : माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी

192

The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : जिल्हयातील एकमेव मोठे सिंचन प्रकल्प असलेल्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावात बांधलेले कर्मवीर कन्नमवार दिना डॅम च्या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावात बांधलेले कर्मवीर कन्नमवार दिना डॅम चे बांधकाम 1969 ते 1974 या पाच वर्षात पुर्ण झालेले असून याची सिंचन क्षमता 12 हजार हेक्टर एवढी आहे. या धरणाच्या कालव्याचे जाळे रेगडी ते चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा पर्यंत पसरलेले आहे. नुकतेच या रेगडी धरणाला माजी आमदार डॉ. उसेंडी यांनी भेट दिली. या प्रकल्पाचे कालवे अंदाजे 48 वर्षापुर्वी बांधलेले असल्याने ते जिर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना सिचंनासाठी पाण्याचा पुरवठा होत नाही. बऱ्याच ठिकाणी जागोजागी या कालव्याला छिद्र पडल्यामुळे पाणी विनाकारण वाहून जातो स्थानिक स्तरावर यंत्रणेमार्फत धातुर मातुर तात्पुर्ती दुरुस्ती केल्या जाते. परंतु हि दुरुस्ती पहिल्याच पाण्यात वाहून जात असल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्या करीता दिर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेगडी ते टेलरिजल पर्यंत या कालव्याचे सिमेंट काॅके्टचे अस्तरीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक आमदार, खासदार यांचे या बाबीकडे दुर्लक्ष असून आता तरी ते या कामाचे नियोजन करुन पाठपुरावा करतील काय? असा प्रश्न उपस्थित होते. म्हणुन शासनाचे या स्थानिक आमदार, खासदार वर अवलंबून न राहता सुमोटो (स्वयंम प्रेरणेने) या कालव्याच्या सिमेंट काॅक्रीट अस्तरीकरणासाठी नियोजन करावे व गडचिरोली सारख्या सिचंन रहित जिल्हयात सिंचन सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात अशी मागणी माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेस डाॅ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे.
यावेळी काॅग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हाकोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, माजी सरपंच ग्रा.प. घोट बाळाभाउ यनगंटीवार, माजी सदस्य सुशील शहा, नाजुक वाळके, माजी सरपंच बाजीराव गावडे, प्रकाश शहा, संजय गावडे, दत्तात्रय करंगामी, हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here