कटरानगट्टा परिसरात झालेल्या पोलीस- नक्षल चकमकीच्या दंडकारण्य चौकशीबाबत

48

The गडविश्व
गडचिरोली,दि. २६ : पोलिस स्टेशन, नारगुंडा अंतर्गत, कटरानगट्टा जंगल परिसरात १३ मे २०२४ रोजी झालेल्या पोलिस- नक्षल चकमकी दरम्यान एक पुरुष व दोन महिला मृतदेह सापडल्याने सदर मृत व्यक्तींच्या मृत्युच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली येथील यांच्या न्यायालयात १५ दिवसाचे आत सादर करावे, असे उपविभागीय दंडाधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.
चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी स्वत: पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन, या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधीत काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती, सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधीत इतर कोणतीही माहिती या मुद्यांना अनुसरुन निवेदन द्यावे.

(thegdv thegadvishva gadchirolinews gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here