गडचिरोली जिल्ह्यात ३९ खरेदी केंद्रांवर रब्बी धान खरेदीला सुरूवात

44

– शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २३०० रुपये दराने हमीभावाने खरेदीचा लाभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ साठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ३९ अधिकृत खरेदी केंद्रांवर रब्बी धानाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या रु. २३००/- प्रति क्विंटल या हमीभावाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली जात आहे.

तालुकानिहाय खरेदी केंद्रांचे वितरण पुढीलप्रमाणे आहे :

▪️ कुरखेडा तालुका – १७ खरेदी केंद्र
▪️ कोरची तालुका – ४ खरेदी केंद्र
▪️ आरमोरी तालुका – ३ खरेदी केंद्र
▪️ वडसा तालुका – १ खरेदी केंद्र
▪️ गडचिरोली तालुका – ३ खरेदी केंद्र
▪️ धानोरा तालुका – २ खरेदी केंद्र
▪️ सिरोंचा तालुका – ९ खरेदी केंद्र

ही खरेदी प्रक्रिया आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि संबंधित महामंडळांच्या माध्यमातून पार पडत आहे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, बाजारपेठेतील अव्यवस्थेपासून संरक्षण मिळावे आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रादेशिक व्यवस्थापक, गडचिरोली यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावरच धान विक्री करावी, तसेच विहित नियम व अटींचे पालन करून अधिकृत पावती प्राप्त करावी. यामुळे कोणतीही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही याची खात्री शेतकऱ्यांना राहील.
शासनाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, शेती क्षेत्रात स्थैर्य आणि शाश्वत उत्पन्नाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #latestnews #2025news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here