– माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची निवेदनातून मागणी
The गडविश्व
अहेरी, ५ एप्रिल : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे कोरेल्ली ( बु ) येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान नुकसान झाले आहे. त्यावेळी तलाठी कोतवाल यांनी प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून पंचनामा केला व तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. बाकी सर्व साजातील नुकसान भरपाई मिळाले आहे परंतु अद्यापही कोरेल्ली बु साजातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले नाही. कोरेल्ली बु येथील शेतकऱ्यांचे नुकसान ग्रस्त यादी मध्ये नावं असून सुद्धा आज पर्यंत कोरेल्ली येथे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले नाही. नुकसानग्रस्त शेतकरी वांरवार महसूल विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे चकरा मारल्या मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वरिष्ठानी लवकरत लवकर चौकशी करून कोरेल्ली बु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी शेतकऱ्यांसह अहेरी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातुन केली. जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर ११ एप्रिल २०२३ रोजी शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल असा इशाराही माजी जि.प.अध्यक्ष यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी अतिवृष्टी शेतकरी आनंदराव दुर्गे, कपिलदेव आत्राम, शिवराम चांदेकर, शिवराम गर्गम, राकेश वेलदी, लक्ष्मण कुळमेथे, केसा आत्राम, कारे मडावी, चौतु आत्राम,नामदेव गावडे,बिचे मडावी,बाजू कुळमेथे,लूला गावडे, शामू आत्राम, म्हरू गावडे, लालसू पुंगाटी, दमा गावडे, राकेश सडमेक सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी व कोरेल्ली नुकसान ग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.