– गडचिरोली पोलीस व मुक्तीपथची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली,१६ मे : तालुक्यातील भगवानपूर जंगलपरिसरात विविध ठिकाणी टाकलेला मोह सडवा, दारू व हातभट्टया असा एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल नष्ट केल्याची संयुक्त कृती गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका टीमने संयुक्तरित्या भगवानपूर जंगलपरिसरात शोधमोहीम राबवली असता, पोलिसांना बघताच दारू विक्रेत्यांनी पळ काढला. यावेळी विविध ठिकाणी मिळून आलेला २७ ड्रम मोहफुलाचा सडवा, ४० लिटर दारू व हातभट्टी नष्ट करण्यात आली. पोलिसांनी १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल नष्ट केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. नागरगोजे, हवालदार पालेलवार व कुंभरे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ संघटक अमोल वाकुडकर, रेवणात मेश्राम उपस्थित होते.(the gdv, the gadvishva,muktipath serch gadchiroli, gadchiroli news updates) Leicester City vs Liverpool, Sameer Wankhede, Brock Lesnar,
Motorola Edge 40)