गडचिरोली आम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश जीवानी

567

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : जिल्ह्यात आम आदमी पक्ष
वाढीसाठी तसेच अनेक गोर-गरीब, सर्वसामान्य
नागरिक तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य
विषयक बाबी विषयी तसेच जिल्ह्यात पक्ष संघटन
करून अनेकांच्या समस्यांचे निराकरण करून कित्तेक आंदोलने उभारून गडचिरोली जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे नाव कानाकोपऱ्यात रुजविण्यात सिंहाचा वाटा असणारे पशुप्रेमी संस्थापक प्रकाश जीवनी यांच्या या सर्व कार्याची दखल घेत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांनी गडचिरोली आम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश धिरुमल जीवानी यांची नियुक्ती ०६ मार्च २०२४ रोजी करण्यात आली.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल तसेच मान्यवर यांच्यावर विश्वास ठेऊन प्रकाश जीवानी हे जिल्ह्यात आणखी जोमाने व प्रत्येक स्तरावर संघटन मजबूत करणार असल्याने इतर पक्षांची लोकसभा निवडणुकीच्या वेळेस गोची होणार आहे. आम आदमी पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रकाश जीवानी यांची नियुक्ती झाल्याबद्दल देसाईगंज आम आदमी पक्षाचे नसीर हाशमी, ईश्वर ठाकूर, ताहीर शेख, मुकेश नरोटे, दीपक धारगाये, शाहेजाद हाशमी, हिरा चौधरी, ताज कुरेशी, धम्म राऊत, वडसा तालुकाध्यक्ष भरत भाऊ दयलानी, शहराध्यक्ष आशिष भाऊ घुटके,सचिव दीपक भाऊ नागदेवे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद दहिवले, चंदू
ठाकरे, पंकज रामटेके, तबरेजभाई, शेखर बारापात्रे, वामन पगाडे, नाजूक लुटे, बाळकृष्ण भांडारकर, सौरव साखरे, देवा जांभुळकर, अतुल ठाकरे व जिल्ह्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here