पोलीस-नक्षल चकमक : महिला नक्षली ठार

2054

– घटनास्थळावरून एक रायफलही जप्त
The गडविश्व
कांकेर, १२ जून :

जिल्ह्यातील छोटे बेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत एक महिला नक्षली ठार झाली आहे.
रविवारी रात्री २० ते २५ नक्षली जंगल परिसरात लपून बसल्याची महिती पोलीस दलास मिळाली असता डीआरजी आणि बीएसएफचे संयुक्त दल शोधमोहीम राबवित असतांना सोमवारी १२ जून रोजी सकाळी बिनागुंडा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली. ही चकमक अर्धा तासाहुन अधिक वेळ चालल्याचे सांगण्यात येत आहे. चकमकीनंतर घटनास्थळी पाहणी केली असता एका महिला नक्षलीचा मृतदेह आढळून आला सोबतच एक रायफलही जप्त करण्यात आली आहे. चकमक झालेल्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. ठार झालेल्या महिला नक्षलीची ओळख पटवने सुरू होते.

उशिरा पटली महिला नक्षलीची ओळख

चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलीची उशिरा ओळख पटली. सुनीता असे मृत नक्षलीची ओळख पटली असून ती एरिया कमेटी सदस्य बलदेव एसजेडसी प्रभारी आरकेवि डिविजन ची सहायक होती. घटनास्थळावरून 303 बोर रायफल 1 नग तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. © (बातमी उशिरा अपडेट करण्यात आली) (the gdv, the gadvishva, kanker, cg news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here