गडचिरोली : पोलीस – नक्षल चकमक, दोन नक्षल्यांना कंठस्नान

1183

– गडचिरोली व बीजापूर (छ.ग) पोलीस यांची संयुक्त कारवाई
– पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या कार्यकाळातील पहिली यशस्वी कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २४ डिसेंबर : उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणा­ऱ्या उपपोस्टे दामरंचा महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सिमेपासुन १० किमी अंतरावर असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात शुक्रवार २३ डिसेंबर ला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास झालेल्या पोलीस- नक्षल चकमकीत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित होते.
महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सिमेपासुन १० किमी अंतरावर असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात नक्षली मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेले असल्याची गोपनिय माहीती मिळाली असता गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) चे ३०० जवान व छत्तीसगडचे डीआरजी पोलीस पथकाचे २० जवान यांनी संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना शुक्रवार २३ डिसेंबर ला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या २० ते ३० नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान पोलीसांनी नक्षल्यांना शरण येण्याचे आवाहन केले असता शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे ३० ते ४५ मिनीटे चकमक उडाली असता पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर १ महिला नक्षल व १ पुरुष नक्षल मृत अवस्थेत आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.

मृत महिला नक्षलीवर होते १६ लाखांचे बक्षीस

कांती लींगव्वा ऊर्फ अनिता (४१) रा. लक्ष्मीसागर, पोस्टे कडेम, जि. निर्मल राज्य तेलंगना असे मृत नक्षलीचे नाव असून ती सध्या डीव्हीसीएम (इंद्रावेली एरीया कमेटी) या पदावर कार्यरत होती. तीच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच तेलंगना शासनाने ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर सदर मृत महीला नक्षल ही मैलारापु अडेल्लु ऊर्फ भास्कर (तेलंगना राज्य समीती सदस्य व सचीव कुमारम भिम डिव्हीजन कमीटी) याची पत्नी होती. तर ०१ अनोळखी पुरुष नक्षलीचा मृतदेह व जखमी अवस्थेत असलेले ०१ नक्षल मिळुन आले. मृत पोलीस नक्षलीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमी नक्षलीचे नाव लचमया कुच्चा वेलादी (२८), रा. टेकामेटा, छत्तीसगड असून तो सध्या जनमिलीशिया सदस्य म्हणुन काम करत होता.

 

घटनास्थळावरून नक्षली साहित्य जप्त

चकमकीनंतर जवानांनी घटनास्थळ परिसरात शोधमोहीम राबविली असता २ नक्षल मृतावस्थेत आढळले तसेच घटनास्थळावर ०२ नग एसएलआर (SLR) रायफल, ०१ नग भरमार रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी – 60 पथकाचे जवान व डीआरजी पोलीस पथक यांचे संयुक्त नक्षलविरोधी अभियान आणखी सुरुच असून जंगल परिसरात तीव्र शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दल व बीजापूर पोलीस यांनी पहील्यांदाच अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियान राबविले असुन गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास बीजापूर पोलीस यांचेकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.

सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे साो., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता साो., व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख साो. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो. यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून नक्षलींना आत्मसमर्पण करून आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) ( Naxal ) (DRG Police Cg) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Gadchiroli C 60) (Police-NaxalnFiring) (Imran Khan) (Nasal vaccine) (Dhamaka Review) (Police naxal encounter, two naxals killed)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here