गडचिरोलीत पोलिस – नक्षल चकमक : दोन महिला नक्षली ठार

135

गडचिरोलीत पोलिस – नक्षल चकमक : दोन महिला नक्षली ठार
– घटनास्थळावरून ए.के. 47 सह शस्त्रसाठा जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगल परिसरात आज १७ सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत पोलिस – नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाले असून घटनास्थळावरून ए.के. 47 रायफल, पिस्तूल, जिवंत दारूगोळा तसेच मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गडचिरोली पोलिस दलाला गट्टा दलमचे काही माओवादी मोडस्के जंगलात दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सी-६० चे पाच पथक रवाना करण्यात आले. तसेच पोस्टे गट्टा-जांबिया पोलीस पथक आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या ई कंपनीने जंगल परिसराची घेराबंदी केली.
दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. मात्र पोलिसांनीही तत्काळ प्रत्युत्तर देत कारवाई केली. चकमक थांबल्यानंतर परिसराची झाडाझडती घेतल्यावर दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले तसेच घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रे व नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले असून जंगल परिसरात अद्यापही अभियान सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxal #Gadchiroli #PoliceEncounter #Naxalites #Maoists #SecurityForces #C60Force #CRPF #AntiNaxalOperation #BreakingNews #IndiaSecurity

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here