The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. ०८ : तालुक्यातील पीएम श्री. जि.प.उ.प्रा. शाळा कोंढाळा च्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे यांच्या वतीने कायद्याचे मार्गदर्शन देण्यात आले.
दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना कायद्याची जान असावी व नवीन कायद्याचे माहिती असणे महत्वाचे आहे, तर विद्यार्थांना आता पासून विद्यार्थांनी अभ्यास करावे जेणे करून समोर आपण आपले ध्येय गाठता येईल असे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे, राजुरा यांनी विद्यार्थ्याना आज केले.
कोंढाळा येथील पीएम श्री जि. प. उ. प्रा. शाळेच्या विद्यार्थ्यांना नवीन कायद्याची ओळख करून देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश्वर ढोरे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगीक ते बोलत होते.
यावेळी उपनिरीक्षक नरेश उरकुडे, राजुरा, सुनील पारधी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, नितेश पाटील शाळा व्यवस्थापन सदस्य, संतोष टेंभुर्णे पदवीधर शिक्षक, प्रवीण शेंडे शिक्षक, सुरेश आदे शिक्षक, ठवरे मॅडम व सर्व शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी तर कार्यक्रमाचे संचालन श्रीमती माधुरी रामगुंडे शिक्षिका व प्रास्ताविक शाळेचे मुख्यध्यापक योगेश्वर ढोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष टेंभुर्णे यांनी मानले.
