२७ एप्रिलला ‘सर्च’ रुग्णालयात प्लॅस्टिक व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया आरोग्य तपासणी

26

The गडविश्व
गडचिरोली,दि. २३ : गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन प्लॅस्टिक व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया आरोग्य तपासणीसाठी उपचार घेणे अतिशय महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व ऊपचार करता यावे, याकरिता चातगाव येथील सर्च रुग्णालयात प्लॅस्टिक व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया ओपीडी २७ एप्रिल ला आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध प्लास्टिक शल्यचिकित्सक डॉ.श्रीरंग पुरोहित व टीम मुंबई या ओपीडीमध्ये आरोग्य तपासणी करतील.
ओठखंड, फाटलेला टाळू , चेहऱ्यावरील धमनीविरोधी विकृती, तिरपी मान, काखेमधील सूज, जळलेल्या त्वचेचे संकुचन , पुरुषात स्तनांची वाढ, जन्मता: जोडलेली बोटे, सामान्य पेक्षा जास्त बोटे, मूत्रमार्ग लिंगाच्या खाली उघडणे या प्रकारचे लक्षणे असणार्‍यां रुग्णांनी ओपीडीचा पुरेपूर लाभ घ्यावा.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. सदर ओपीडीमध्ये डॉक्टरांच्या तपासणी अंती ऑपरेशन करिता निवड झालेल्या रुग्णास मोफत शस्त्रक्रिया सुविधा आणि ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व नातेवाईक यांना मोफत मेससुविधा देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी प्लॅस्टिक व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन चातगाव येथील सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here