– ३ ते ९ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन सप्ताह कार्यक्रम
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), दि. ०४ : दिव्यांगाना सहानुभूती नको विश्वास हवा असे प्रतिपादन पंचायत समिती कुरखेडा चे गट विकास अधिकारी धिरज पाटील यांनी केले. ३ ते ९ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून दिव्यांग रॅली ला हिरवी झेंडी दाखवताना बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी भोगे, कुरखेडाचे केंद्रप्रमुख संजय मेश्राम, रामगडचे केंद्रप्रमुख जागेश्वर माने, विकास हायस्कुल चे खोब्रागडे, जि.प.शाळा कुरखेडाचे मुख्याध्यापक तुलावी, शिक्षकेत्तर व इत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी गट साधन केंद्र कुरखेडा येथील विशेष तज्ञ हेमंत सपाटे, कैलास जगने, संतोष लेनगुरे, प्रेमलाल पटले तसेच गटसाधन केंद्र कुरखेडा येथील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. आभार रोशनलाल गजभिये यांनी मानले.