तालुकास्तरीय विचार-स्पर्धा कार्यक्रमात ९ शाळांचा सहभाग

196

The गडविश्व
गडचिरोली, १ मार्च : चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी केंद्र शाळेत तंबाखू-दारूमुक्त शाळा विचार स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेत सात केंद्रातील नऊ शाळांनी सहभाग घेतला.
येणारी पिढी व्यसनमुक्त व्हावी, विद्यार्थ्यांना व्यसन लागू नये, विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम कळावे या उद्देशाने मुक्तीपथ अभियानाच्या वतीने तालुक्यातील संपूर्ण शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनतर सात केंद्रावर ही स्पर्धा पार पडली. तालुका स्तरीय स्पर्धेसाठी सात केंद्रातील नऊ शाळांची निवड करण्यात आली. यात ४५ विद्यार्थी व १० शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी विविध प्रकल्प सादरीकरण केले.
परीक्षक म्हणून वाळके सर, झाडे सर यांनी काम बघितले. या स्पर्धेत कुनघाडा जि.प. शाळेने प्रथम तर पेटतळा जि.प. शाळेने दुसरा क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटक आनंद इंगळे, संचालन उपसंघटक आनंद सिडाम यांनी केले. यावेळी सोनी सहारे व प्रियंका भुरले उपस्थित होते. कायद्याने बंदी असूनही अवैधरित्या विक्री होणाऱ्या व शरीरास हानिकारक अशा दारू, तंबाखूजन्य पदार्थांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी जि.प. शाळांमध्ये मुक्तिपथ अभियानाच्या वतीने दारू व तंबाखू मुक्त शाळा विचार स्पर्धा कार्यक्रम शाळेच्या सहभागातून घेण्यात आला.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl) (Vidarbha International School Gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here