The गडविश्व
गडचिरोली, ११ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उत्तरार्धात ९ ऑगस्ट २०२३ पासून देशभरात मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान राबविण्यात येत आहे. गडचिरोली तालुक्यातील किसान विद्यालय जेप्रा येथे या कार्यक्रमाअंतर्गत ‘पंचप्रण शपथ’ घेण्यात आली.
दरम्यान कार्यक्रमाचे सेल्फी आणि फोटो काढून ते संबंधित संकेतस्थळावर टाकण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शपथ विधी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.