The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसला जागा मिळावी अशी आमची भूमिका आहे असे प्रतिपादन पदविधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी आज केले.
गडचिरोली जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात गडचिरोली येथे घेण्यात आलेल्या बैठकीला आले असताना ते पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते.
पत्रकार परिषदेला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटाराम तलांडी व सर्व विभागातील तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या वतीने पूर्व विदर्भातील मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. यात आमदार अभिजित वंजारी यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. आज गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ता यांची बैठकीचे आयोजन करून सर्वांचे मत आमदार वंजारी यांनी जाणून घेतले. आमदार वंजारी पुढे बोलताना म्हणाले की, बैठकीमध्ये आगामी निवडणुकीत तिन्ही विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे उमेदवार पुढील निवडणुकीला कसे सामोरे जाणार याबाबत सुचना देण्यात आल्या तसेच विधानसभेला पुढील कशी रूपरेषा असली पाहिजे, तिन्ही मतदार संघात स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी यासाठी सुद्धा आपले प्रयत्न राहणार आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींच मत काय याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली व तिन्ही मतदार संघात कॉग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी अशी आमची भूमिका आहे असे सुधा आमदार वंजारी पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.

सुरजागड इस्पात प्रा. लि. च्या भूमिपूजनाचा केला निषेध
१७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सुरजागड इस्पात प्रा. लि. च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यात केवळ अहेरी विधानसभेचे आमदार मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांना निमंत्रण होते मात्र जिल्ह्यातील इतर आमदार तसेच खासदार यांना निमंत्रण नसल्याने आमदार अभिजित वंजारी यांनी निषेध नोंदवित नाराजी व्यक्त केली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )