१९ ला भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

87

– जैविक शेती-तणावमुक्त शेतकरी या विषयावर होणार मार्गदर्शन
The गडविश्व
गडचिरोली, १७ जानेवारी : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि टिएसऑर्गो ऑर्रगँनिक्स प्रा.लि. नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन १९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११. ०० वाजता भाग्यरेखा सभागृह, नागपूर रोड मुल जि.चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. या मेळावा दरम्यान ‘जैविक शेती -तणावमुक्त शेतकरी’ या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून विषमुक्त अन्नधान्य उत्पादन तसेच शेतकरी पुत्रांकरिता रोजगाराची संधी उपलब्ध करून शेतमाल विक्री संबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सदर मेळाव्याला उदघाटल म्हणून नागपूर विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साळवे तर मुख्य अतिथी व मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, चंद्रपूर उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, मूल तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष अतुलदादा घुईखेडकर, विशेष अतिथी म्हणून टिएसऑर्गो नागपूर चे व्यवस्थापकीय संचालक सूर्यभान ठाकरे, कमलेश झोडे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्या नंतर स्वरूची भोजनाची सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेश निमजे, राहुल पर्वतकर, प्रफुल सोनटक्के, रोशन काकडे, विश्वनाथ आत्राम, अविनाश शेंडे, अभय ढेंगे, राहुल पलाडे, सचिन गडपायले, सौ.लता गहाणे तथा समस्त टिएसऑर्गो परिवार यांनी केले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli-Chandrapur News Updates) (Organized a grand farmers’ meeting on the 19th) (TS Argo)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here