शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात विविध स्पर्धेचे आयोजन

177

The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli),१ डिसेंबर : सामाजिक न्याय विभाग गडचिरोली अंतर्गत शासकीय मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह नवेगाव, येथे विद्यार्थ्यांच्या कला गुण व कौशल्य वाढवण्याच्या अनुषंगाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, त्यामधे गीत गायन, वकृत्व स्पर्धा व प्रश्न मंजुषा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसतिगृहाचे गृहापाल एम. एच. गाढवे व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कृपाल शेंडे, शुभम भैसारे, अमित देवतळे व अजय गेडाम उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व्यक्ती महत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर स्पर्धेचे संचालन वर्ग ९ वी चा विद्यार्थी कु. क्षितिज गलबले व वंश भोवते यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांमध्ये भरपूर संख्येने उपस्थित राहून स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष शमकुळे यांनी केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे आभार भूषण पोवरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here