जागतिक महिला दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

278

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ८ मार्च : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वयं रक्तदाता जिल्हा समिती, आश्रय फाउंडेशन, आरमोरी, पतंजली योगपिठ आरमोरी, उप जिल्हा रूग्णालय, आरमोरी यांचे संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले.
या रक्तदान शिबिरात कमलाकर चाटारे, नितेश कुथे, श्रेयेश जोशी, श्रीकांत राऊत, देवेंद्र कुथे, तोहित नान्हे, राजेश कांबळे, हिमांशू मातेरे, प्रतिक्षित बावणे, मोसम लिंगायत, समीर मडावी,नकुल वरघंटी, होमकांत राऊत, प्रफुल्ल नैताम, प्रफुल्ल दोनाडकर, रविंद्र भर्रे, अभिषेक हेमके, मुकेश नागरे, अरविंद सेलोटे, क्रिष्णा दोनाडकर, मयुर सोरते, तुमदेव मेश्राम, इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हिमांशू मातेरे, सौरभ माकडे, देवेंद्र कुथे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सौ. ज्योतीताई खेवले, प्रस्ताविक चारुदत्त राऊत, आभार सौ. संगीताताई रेवतकर यांनी मानले.
उद्घटनप्रसंगी डॉ. छायाताई उईके, डॉ. अमोल धात्रक, कु. माया पारधी सिस्टर, सौ. बावणे, सौ. चंदाताई राऊत, सौ. प्रितीताई भोयर, सौ. रजनीताई किरणापुरे, के. किरणापुरे, मुकूल खेवले प्रामुख्याने उपस्थित होते.
रक्त संकलन करण्याकरिता जिल्हा रक्तपेढीच्या श्रीमती समता खोब्रागडे, कु. मोहिनी चुटे, कु. भारती चोपकर, सतिश तडकलावार, देशमुख, बंडू कुंभारे यांचे सहकार्य लाभले.
मोनाली तिजारे, स्वाती ढोरे, दिक्षा बांबोळे, संदेश मेश्राम, ययाती राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले.

जिल्ह्यातील कित्येक महिला रुग्णांना रक्तपुरवठा करून सन्मानाने जीवन जगण्यास मदत करून ‘ स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ महिलांप्रति आदर व्यक्त करीत आहेत.
-चारुदत्त राऊत, अध्यक्ष स्वयं रक्तदाता जिल्हा समिती, गडचिरोली.

(The gadvishva) (thegdv) (blood donation camp) (women’s day 2023) (Armori gadchiroli news updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here