The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० ऑक्टोबर : श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री. जी. सी. पाटील मुनघाटे कला वाणिज्य विज्ञान कला महाविद्यालय धानोराच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र मुनघाटे यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त श्री.जे. एस. पी. एम. महाविद्यालयाच्या वतिने अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक टीकाराम धाकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदाना बद्दल माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या कार्याचा गुण गौरव करताना त्यांनी आदिवासी क्षेत्रात शिक्षणाची गंगा आणल्याने येथील आदिवासी मुलामुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यावेळी प्रा. कैलास खोबारगडे, प्रा. भाविकदास करमनकर, प्रा. वीराग रणदिवे, प्रा. वसंत आवारी, प्रा. वटक मॅडम उपस्थित होते. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वसंत चुदरी, अलका सजनपावर ,छाया चंदेल, गणेश लांबट, भास्कर कायते, डंबाजी हर्से ,बालाजी राजगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. वसंत आवारी यांनी केले तर आभार प्रा.कैलास खोबारगडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
