– नवीन पदाधिकाऱ्यांची निवड
The गडविश्व
गडचिरोली, ६ एप्रिल : नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था गडचिरोलीची नवीन कार्यकारिणी ४ एप्रिल रोजी करण्यात आली. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड नवर्निवाचीत १५ संचालक मंडळ असलेल्या संचालकातून करण्यात आली.
संस्थेचे नवीन अध्यक्ष म्हणून शरद सोनटक्के तर संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून नगर परिषद कर्मचारी कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष रविन्द्र ऊईके यांची निवड करण्यात आली. तर नगर परिषद कास्ट्राईब संघटनेचे सचिव रविन्द्रकुमार पटले यांची संस्थेचे मानद सचिव म्हणून निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे वैभव कागदेलवार यांची संस्थेचे खजीनदार म्हणून निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील यांनी घेतली. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश भांडेकर यांनी पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कास्ट्राईब महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख व संस्थेचे संचालक कांतीलाल साखरे यांनी केले तर आभार सौ.वंदना गेडाम मॅडम यांनी मानले.
संस्थेचे नवर्निवाचीत संचालक व पदाधिकारी
१) शरद सोनटक्के. अध्यक्ष
२) रविन्द्र ऊईके उपाध्यक्ष
३) रविन्द्रकुमार पटले मानद सचिव
४) वैभव कागदेलवार खजीनदार
५) राकेश शिलेदार संचालक
६) प्राणहंस रामटेके संचालक
७) कांतीलाल साखरे संचालक
८) सौ. वंदना मडावी संचालक
९) सौ. निशा साहाळा संचालक
१०) संतोष मुनघाटे संचालक
११) विरेंद्र सोनवाने संचालक
१२) किशोर सेमसकर संचालक
१३) रविन्द्र गंदेवार संचालक
१४) दिनकर थोटे संचालक
१५) राजेश दरेकर संचालक