देसाईगंज आम आदमी पक्षाची नवीन शहर कार्यकारिणी गठीत

118

– विकासाच्या नवा वळणावर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : देसाईगंज येथे आज आम आदमी पक्षाची नवीन शहर कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश जिवानी, माजी पोलीस निरीक्षक अमृत मेहेर, जिल्हा उपाध्यक्ष राजू मडावी, कुरखेडा तालुका अध्यक्ष ताहीर शेख, कुरखेडा शहर युवा संघटक इरफान पठाण, युवा तालुका अध्यक्ष अतुल सिंदराम, तालुका संघटक चेतन गहाणे, महेंद्र मडावी, देवा जांभुळकर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत शहर अध्यक्ष म्हणून आशिष दादाजी घुटके, तालुका अध्यक्ष म्हणून भरत दयलानी, शहर महासचिव म्हणून दिपक नागदेवे, शहर सचिव म्हणून फारुक पटेल, मुख्य प्रवक्ते म्हणून भीमराव मेश्राम, उपाध्यक्ष नावेद शेख, सहसचिव नाजूक लुटे, सह संघटन मंत्री पंकज रामटेके, महिला आघाडी अध्यक्ष शिल्पा बोरकर यांचा समावेश आहे. तसेच सदस्य म्हणून आशिष कोवे, वामन पगाडे, देवा जांभुळकर, बाळकृष्ण भानारकर, रामदास गोंडाने, साबीर शेख, अतुल ठाकरे, शेखर बारापात्रे यांची निवड झाली आहे.
नव्या कार्यकारिणीच्या गठनामुळे देसाईगंज शहराच्या विकासास एक नवा संचार मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवनिर्वाचित नेतृत्वाला एकजुटीने काम करून शहराच्या प्रगतीसाठी अधिक श्रम करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांना शहराच्या समृद्धीसाठी कटीबद्ध होण्याचे प्रेरणादायक संदेश दिले गेले. या नेतृत्वाला सर्व स्तरांवरून शुभेच्छा मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here