– जिल्ह्यातील आदिवासी समुदायावर आधारित हिंदी चित्रपटाची निर्मिती
The गडविश्व
गडचिरोली, १५ जून : मुंबईच्या तृप्ती भोईर फिल्म्सतर्फे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समुदायावर आधारित एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटात जिल्ह्यातील १० ते ५५ वर्षापर्यंतच्या मुले, मुली, महिला, पुरुष या नवोदित कलाकारांना काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने व कलाकारांचा वाढता कल पाहून गडचिरोली शहरातील वैभव हॉटेल येथे ऑडिशन १९ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.
मराठी सिनेअभिनेत्री तृप्ती भोईर यांच्या पुढाकाराने एका हिंदी चित्रपटाची शूटींग गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी गावांत नोव्हेंबर २०२३ मध्ये केली जाणार आहे. या जिल्ह्यात विविध कलागुण संपन्न कलाकार आहेत. त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देत यातून त्यांना रोजगारांची संधी मिळावी, या भावनेतून दुसऱ्यांदा वैभव हॉटेल मध्ये १९ जून रोजी ऑडिशन ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील कलाकारांनी ऑडिशनसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी सिनेअभिनेत्री तृप्ती भोईर यांनी केले आहे.