नक्षल्यांचा धुमाकुळ : लोहखनिज वाहतुक करणाऱ्या चार ट्रक ची रात्रोस केली जाळपोळ

3345

-ट्रकचे लाखोंचे नुकसान, पोलीस ठाण्याजवळच जाळपोळ केल्याने खळबळ
The गडविश्व
नारायणपूर, दि. ०१ : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नक्षली पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या चार ट्रक ची जाळपोळ केल्याची घटना छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सदर घटना शनिवारी रात्रोच्या सुमारास घडली.
छत्तीसगड च्या अमदाई व्हॅली खाणीतून ट्रक हे लोहखनिज घेऊन जात होते. दरम्यान ओरछा-नारायणपूर मार्गावरील छोटेडोंगर पोलीस ठाण्याजवळ नक्षल्यांनी ट्रक ला अडविले. चालकांना ट्रक मधून उतरायला लावले त्यानंतर चारही ट्रकला नक्षल्यांनी आग लावून पेटवून दिले आणि नक्षली घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत पूर्ण ट्रक जाळून खाक झाले होते. सदर घटनेने खळबळ उडाली असून नक्षली पुन्हा एकदा सक्रिय झाक्याचे दिसून येत आहे. ट्रकची जाळपोळ केल्याने ट्रक मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #cgnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here