नक्षल्यांनी केली आपल्याच साथीदाराची हत्या

2252

– महिला नक्षल्यांवर वाईट नजर टाकत असल्याने दिली शिक्षा
The गडविश्व
कांकेर, २१, जून : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त कोयलीबेडा परिसरात नक्षल्यांनी आपल्याच साथीदाराची गळा चिरून हत्या केल्याची माहिती पूढे आली आहे. मनू दुगा असे मृतक नक्षलीचे नाव असून तो महिला नक्षल्यांवर वाईट नजर ठेवत असल्याने त्याचा गळा चिरून हत्या करत शिक्षा दिली आहे.
मृतक नक्षली मनू दुगा हा नक्षल्यांच्या पीएलजीए बटालियन १७ चा सदस्य होता, त्यावर ५ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. तो सध्या किस्केडो एरिया कमिटीचा सदस्य होता तर त्याचा अनेक नक्षली घटनांमध्ये सहभाग होता. तो सहकारी महिला नक्षलींवर वाईट नजर टाकायचा.
एका वृत्त संस्थेनुसार नक्षल्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेच्या महिलांनी मनू दुगा बाबत अनेकदा तक्रार केली त्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती मात्र तो आपल्या कृत्यापासून दूर सारत नव्हता तसेच संघटनेच्या महिलांशी गैरवर्तन करायचा व अश्लील बोलत होता, अनेकदा समजावूनही त्यात कोणताही बदल न झाल्याने जनता दरबार लावून त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह कोयडीबेडाजवळील जंगलात टाकून दिला होता. पोलिसांनी मृतदेहाजवळून पत्रकही जप्त केले आहे. पत्रकात नक्षल्यांनी त्याच्या हत्येची कारणे लिहिली आहेत.

(the gdv, the gadvishva, kanker, naxal, cg news)naxcaaa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here