– परिसरात दहशत, मृतदेहाजवळ टाकले पत्रक, पोलीस खबऱ्या असल्याचा केला आरोप
The गडविश्व
दंतेवाडा, दि. २० : नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत दोघांची जंगलात नेऊन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. हि घटना छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील बरसूर पोलीस स्टेशन हद्दीतील भैरमगड ब्लॉकमधील तोडमा गावात घडली. दोघांवरही पोलीस खबऱ्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षक बमन कश्यप आणि ग्रामस्थ अनिश राम असे हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहे.
नक्षल्यांनी दोघांना रात्रोच्या सुमारास घरातून घेऊन गेले व जंगलामध्ये त्यांची हत्या करून मृतदेह गावात परत सोडले.
या घटनेची जबाबदारी नक्षलवाद्यांच्या पूर्व बस्तर विभाग समितीने स्वीकारली असून एक प्रेस नोट जारी केली आहे. ज्यामध्ये शिक्षकावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती गावातील लोकांनी पोलिसांना दिली असून पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. परिसरात पंचायत निवडणुकीचे वारे असून निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
