गडचिरोली : पीएलजी सप्ताह दरम्यान नक्षली बॅनर आढळले

822

– वैरागड, कुरखेडा-वाकडी मार्ग व पलसगड बसथांबा वर आढळले बॅनर
The गडविश्व
गडचिरोली, ५ डिसेंबर : नक्षल्यांद्वारे दरवर्षी २ ते ८ डिसेंबर या कालावधीत पीएलजी सप्ताह पाळला जातो. यंदाही हा सप्ताह पाळत असतांना नक्षल्यांद्वारे आरमोरी तालुक्यातील वैरागड, कुरखेडा तालुक्यातील पलसगडसह कुरखेडा वाकडी मार्गावर नक्षल बॅनर लावल्याचे आढळून आले.
नक्षल्यांद्वारे २ ते ८ डिसेंबर या कालावधीत पाळण्यात येणाऱ्या पीएलजी सप्ताह दरम्यान नक्षल्यांद्वारे कोणतीही हिंसक घटना घडू नये याकरिता पोलीस विभागाने नक्षल विरोधी अभियान तीव्र केले आहे. दरम्यान सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आरमोरी-कुरखेडा आणि देलनवाडी मार्गाकडे जाणाऱ्या टी-पॉइंटवर एका हॉटेल समोर बॅनर लावलेले दिसून आले. तर कुरखेडा-वाकडी मार्गावर तसेच पलसगड बसथांबा परिसरात बॅनर लावल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे, नक्षल सप्ताहदरम्यान जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात बॅनर व पत्रके टाकून नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न नक्षली करत असतात मात्र यावेळी नक्षल्यांनी संवेदनशिल नसलेल्या भागातील नागरिकांमध्ये बॅनरच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी नक्षल बॅनर काढले आहे मात्र नक्षल बॅनर आढळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(The Gadvishva) (naxal Banner) (Gadchiroli News Updates) (Viragadh) (Kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here