The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३० सप्टेंबर : सुपोषित भारत, साक्षर भारत सशक्त भारत या कार्यक्रमांतर्गत “सही पोषण, देश रोशन” या कार्यक्रमाचे आयोजन काल २९ सप्टेंबर २०२३ रोजी धानोरा येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना धानोराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. देवांगना गोपीदास चौधरी महिला बालकल्याण सभापती नगरपंचायत धानोरा, प्रमुख अतिथी म्हणून समीर ए. कुरेशी माजी नगरसेवक धानोरा, सौ. कल्याणी काशिनाथ गुरनुले नगरसेविका नगरपंचायत धानोरा, वैष्णवी मॅडम पल्लवी प्रोजेक्ट धानोरा, नीलिमा गेडाम मॅडम बाल विकास प्रकल्प अधिकारी धानोरा, अंकुश गांगरेड्डीवार मॅनेजर हिरामण फाउंडेशन, बुल्ले महिला संरक्षण समिती धानोरा, सौ बारसागडे मॅडम विस्तार अधिकारी धानोरा, वाघाडे मॅडम पर्यवेक्षिका मुरूमगाव, उषाताई चिमूरकर पर्यवेक्षिका रांगी आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रमात धानोरा, रांगी मुरूमगाव , पेंढरी ,सुरसुंडी, कारवाफा या सर्कलमधील सर्व अंगणवाडी सेविका सहभागी झालेल्या होत्या. या कार्यक्रमाचे संचालक वंदना महेश चिमूरकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. यांमिनी झंझांळ यांनी मानले.
