The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०१ : तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन कारवाफा येथे २७ ते २९ डिसेंबर २०२४ ला संपन्न झाले. सदर स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरुमगाव येथील साद मेहबुबखाॅ पठाण वर्ग ६ वा माध्यमिक विभाग मुले व कु किर्ती विजय मिस्त्री वर्ग ७ वा हे दोघेही बुद्धिबळ (चेस) स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरले आहेत. या दोघांनाही शाळेचे पदवीधर शिक्षक चंदू रामटेके यांनी प्रशिक्षण दिले होते.
दोन्ही बुद्धिबळपटूंनी तीन-चार फेऱ्यात विरुद्ध स्पर्धकाला गारद करून अंतिम फेरीत यश संपादन केले. यावर्षी बाल क्रीडा संमेलनात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. त्यात त्यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीची चमक दाखवित चॅम्पियन ट्रॉफी चे मानकरी ठरले.
त्यांच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, केंद्रप्रमुख अरुण सातपुते, शाळेच्या वतीने मुख्याध्यापक चलाख, प्रशिक्षक चंदू रामटेके, पदवीधर शिक्षिका गायत्री खेवले, सुमन किरंगे, रविता शेडमाके, संगीता भडके, रुपेश शिवणकर, जगदीश बावणे आदींनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांकडून दोन्ही बुद्धिबळपटूंचा सत्कार करण्यात आला.
