६ लाख ३२ हजारांचा मोहसडवा नष्ट

188

-पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २६ नोव्हेंबर : तालुक्यातील रानभूमी जंगलपरिसरात विविध ठिकाणी सुरू असलेले दारुअड्डे उद्धवस्त करीत ६ लाख ३२ हजारांचा मोहसडवा व साहित्य नष्ट करण्यात गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमुला यश आले आहे.
रानभूमी परिसरात सिताटोला, घोटेविहिर, जांभळी, माडेमुल, चांदाळा, रानभूमी गावातील विक्रेते जंगलपरिसरात हातभट्टी लावून दारू गाळतात व गडचिरोली शहर व विविध गावात किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करतात. जंगलपरिसरात हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने रानभूमी जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान, विविध ठिकाणी मोहफुलाचा सडवा, साहित्य आढळून आले. तसेच पोलीसांना बघताच एका विक्रेत्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनास्थळी जवळपास १३६ ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य आढळून आले. असा एकूण ६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी अज्ञात विक्रेत्यावर गुन्हा दाखल असून शोध सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार शिवदास दुर्गे, मुक्तीपथचे रेवणाथ मेश्राम यांनी केली.

#The Gadvishva #Muktipath #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here