The गडविश्व
गडचिरोली, २६ सप्टेंबर : राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत गडचिरोली येथील लक्ष्यवेध अकॅडमीचा विद्यार्थी मोन्टी मोहन मेश्राम हा विद्यार्थी यशस्वी होत राज्यात १७ वा आलेला आहे.
लक्ष्यवेध अकॅडमीचे संचालक प्रा. राजीव सर यांच्या हस्ते मोन्टी मोहन मेश्राम या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभप्रसंगी मोन्टीने आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यासात सातत्य कसे ठेवावे, मुलाखतीची योग्य तयारी कशाप्रकारे करावी याविषयी मार्गदर्शन केले. माझ्या या यशात माझे आई- वडील मित्र परिवाराचा तसेच लक्ष्यवेध अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राजीव सर यांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रेयश रामटेके यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. राजीव सर यांनी केले. या सत्कार समारंभाला अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.