आरमोरीत मोठी कारवाई : १.४५ कोटींचा अवैध रेतीसाठा जप्त, चार तस्कर अटकेत

266

– धडक करावाईमुळे रेती तस्कारांचे धाबे दणाणले
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, दि. ११ : जिल्ह्यात वाढत्या अवैध रेती तस्करीच्या पार्श्वभूमीवर आरमोरी पोलिसांनी देऊळगाव व डोंगरसावंगी येथील वैनगंगा नदी घाटांवर ९ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत १ ट्रक, २ पोकलॅंड मशिन्स आणि एकूण १ कोटी ४५ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चार तस्करांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
डोंगरसावंगी येथे पोकलॅंडच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध उत्खनन दरम्यान पोलिसांनी धाड टाकत तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ऋषी सीरकुरा राऊत (वय ५६, डोंगरसावंगी), विकेष कुमारवीर चंद्रसिंह (वय २८, मोहाड, यवतमाळ), व ट्रकचालक रूपेष अजित शेख (वय २९, वर्धा) यांचा समावेश आहे. या ठिकाणी २५ लाखांचे ट्रक, ६० लाखांचे पोकलॅंड आणि १० ब्रास अवैध रेती असा सुमारे ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त झाला.
दरम्यान, देऊळगाव येथील कारवाईतही पोकलॅंडच्या सहाय्याने अवैध उत्खनन होत असल्याचे आढळून आले. यावेळी मध्यप्रदेशातील मो. तौकीर अब्दुल हसन (वय २४, अहेरतपूर) याला अटक करण्यात आली असून शुभम निंबेकर (रा. आरमोरी) हा आरोपी सध्या फरार आहे. येथे ६० लाखांचे पोकलॅंड आणि १०० ब्रास रेतीसाठा (६७,५०० रुपये) असा एकूण ६० लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही संपूर्ण कारवाई ठाणेदार कैलास गवते यांच्या नेतृत्वात आरमोरी पोलिस पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews #armorinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here