– माळी समाज कृती समन्वय समितीचा उपक्रम
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२९ : धानोरा येथे माळी समाज समन्वय कृती समिती च्या वतिने काल 28 नोव्हेबर 2023 ला महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी दिन शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
धानोरा येथे माळी समन्वय कृती समितीच्या वतिने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
मा. मुकाजी भेंडारे अध्यक्ष, माळी समाज, धानोरा प्रमुख मार्गदर्शक
मा. प्रा. जावेद पाशा कुरेशी साहित्यीक विचारवंत, नागपूर
विशेष अतिथी देवनाथजी लेनगुरे माजी उपसभापती पं.स. धानोरा, विनोद लेनगुरे माजी जि.प. सदस्य गडचिरोली, महागुजी वाडगुरे माजी पं.स. सदस्य, धानोरा, पुरुषोत्तम लेनगुरे कार्याध्यक्ष, तालुका माळी समाज धानोरा, सौ. देवांगनीताई चौधरी सभापती, महिला व बालकल्याण न.पं. धानोरा, सौ. कल्याणीताई गुरनुले उपसभापती, महिला व बालकल्याण न.पं. धानोरा,
वामन गावतुरे उपाध्यक्ष माळी समाज धानोरा, सौ. किरणताई सोनुले अध्यक्ष, माळी समाज महिला मंडळ, धानोरा आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळी समाज समन्वय कृती समितीच्या वतीने धानोरात फेरी काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला फुलांचा हार घालून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मार्ग दर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुभाऊ मोहुर्ल यांनी, संचालन भास्कर सोनुले तर वामन वाडगुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला माळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
