The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.०१ : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे “महाराष्ट्र दिन” साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आमची शाळा तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी ०१ मे २०१९ रोजी तालुक्यातील पुराडा मार्गावर जांभूळखेडा येथे नक्षली भ्याड हल्ल्यात शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विद्यालयातील पर्यवेक्षक किशोर कोल्हे, जेष्ठ शिक्षक उद्धव वाघाडे,बी.आर.सोरते, के.पी.सोरते, एल.बी.कोडापे, एन.व्ही.गेडाम, पी.बी.मुंगणकर, एस.ए.गजभिये, एन.एस.कोहाडे, सी.एन.नरुले, व्ही.एस.गलबले , एस.ए.खेवले , आर.जे.भोयर, एस.ए.वैद्य व शिक्षकेत्तर कर्मचारी ए.एल.बांबोळे, कालिदास मलोडे, शिवा भोयर व घनश्याम भोयर हे उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #jambhulkheda #maharashtradin )