जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी येथे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

282

– शिक्षक उपलब्ध करून देण्याची शाळा व्यवस्थापन समिती ची सीईओ यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २४ ऑगस्ट : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, रांगी येथे विद्यार्थी संख्या भरपूर प्रमाणात असतानाही शिक्षका अभावी येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने येथील शाळेत लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन मंगळवार २२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नव्यानेच रुजु झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन रांगी गावचे प्रथम नागरिक सरपंचा सौ.फालेश्वरी प्रदिप गेडाम यांनी स्वागत केले. त्यानंतर गावच्या शाळेची परिस्थिती माडली. धानोरा तालुक्यातील रांगी जिल्हा परिषद केंद्र शाळा असून येथे १ ते ७ वर्ग आहेत. या शाळेची पटसंख्या एकूण १८५ आहे. वर्ग १ ते ५ ची पटसंख्या १३१ असून चार शिक्षक कार्यरत आहेत व वर्ग ६ ते ७ वी ची पटसंख्या ५४ असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. वर्ग १ ते ५ ची पटसंख्या बघता एका शिक्षकाची आवश्यकता आहे. प्राथमिक शिक्षण हाच विद्यार्थ्यांचा पाया असुन तोच भक्कम असण्याकरिता शिक्षकांची गरज आहे.
शिक्षका अभावी वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. मागील २०२१-२२ व २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून एक शिक्षक कमी असल्याने शिक्षकावर शिकविण्याचा अतिरिक्त ताण पडल्याने मुलांच्या शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. तसेच धानोरा तालुक्यातून जिल्हा परिषद केंद्र शाळा रांगी ची निवड पंतप्रधान यांच्या पीएमश्री योजनेमध्ये तालुक्यातील एकमेव शाळेची निवड झालेली आहे. सध्या स्थितीत विषय शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त भार पडत असल्याने शासकीय कामाच्या बोजामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी सदर शाळेचा दर्जा व शिक्षकाचे स्थान, मुलांचे शिक्षणाचे स्तर उंचावण्याकरिता आपल्या स्तरावरून योग्य कारवाई करून शाळेकरीता एक शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना देण्यात आले
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र भुरसे, सरपंचा सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम, उपसरपंच नुरज सुरेश हलामी, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भुरसे, संगिता नितिन कावळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्रभाकर गोपाळा रोहनकार, राकेश दयाराम कोराम ग्रामपंचायत सदस्य, शशिकला उमाजी मडावी ग्रा.प.सदस्य, मनोज डोमाजी किरमे आदि उपस्थित होते.

(the gdv, the gadvishva, gadchiroli, talati recrutment 2023, talathi exam timetable, Prigozhin,TVS X, Cincinnati vs Inter Miami,King of Kotha,AFC Champions League,AP EAMCET Seat Allotment 2023,Alien, News Today,RRB PO Result 2023,The Village, BBC News, Rebel Moon, India Ireland,G20 Summit,AP EAMCET 2023, Earth,CNN,Hardik pandya, #isrochandrayaan3mission , #IndiaOnTheMoon, #चंद्रयान_3, #VikramLander, “दक्षिणी ध्रुव”, “चंदा मामा” , “Vande Mataram” , #NASA , “India “)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here