– अनेक विद्यमान खासदारांची तिकीटे कपात ?
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : आगामी लोकसभा निवडणुकी करिता भाजप च्या वतीने बुधवार १३ मार्च रोजी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे यात अनेक विद्यमान खासदारांची तिकीटे कापण्यात आली आहे.
भाजप च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये आद्यपही गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राबाबत नाव पुढे आले नसल्याने सस्पेंस कायम आहे. या क्षेत्रासाठी विद्यमान मंत्री मागे लागेल असून नवा चेहरा पाहायला मिळणार काय याबाबत अद्याप काही सांगता येणार नाही.
भाजपच्या दुसऱ्या यादीत एकूण ७२ उमेदवारांची नावे आहेत. त्यात महाराष्ट्रातील २०, कर्नाटकमधील २६, मध्य प्रदेशातील ५, गुजरातमधील ८, तेलंगणा आणि हरियाणातील प्रत्येकी ६, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी २, दादरा-नगर हवेली आणि त्रिपुरातील प्रत्येकी १ जागेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपने आपल्या पहिल्या यादीत १९४ उमेदवार जाहीर केले होते, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. पक्षाच्या पहिल्या यादीत २८ महिला आणि ४७ तरुणांचा समावेश आहे, तर २७ उमेदवार अनुसूचित जाती, १८ अनुसूचित जमाती आणि ५७ इतर मागासवर्गीय आहेत. या यादीत उत्तर प्रदेशातील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशातील २४, गुजरात आणि राजस्थानमधील १५-१५ जागा, केरळ आणि तेलंगणातील १२-१२ जागा, झारखंड, छत्तीसगड आणि आसाममधील ११-११ जागा आणि दिल्लीतील पाच जागांचा समावेश होता. आता आज अखेर भाजपची दुसरी यादी जाहीर झाली.
महाराष्ट्रातील दुसऱ्या यादीमध्ये नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यासह २० जणांचा समावेश आहे.
महाराष्ट्र भाजपची यादी जाहिर
1. नंदुरबार – हिना गावित
2. धुळे – सुभाष भामरे
3. जळगाव – स्मिता वाघ
4. रावेर रक्षा खडसे
5. अकोला – अनुप धोत्रे
6. वर्धा – रामदास तडस
7. नागपूर – नितीन गडकरी
8. चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
9. नांदेड – प्रतापराव चिखलीकर
10. जालना – रावसाहेब दानवे
11. दिंडोरी भारती पवार
12. भिवंडी-कपिल पाटील
13. मुंबई उत्तर – पियुष गोयल
14. मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
15. पुणे- मुरलीधर मोहळ
16. अहमदनगर सुजय विखे पाटील
17. लातूर सुधाकर सुंगारे
18. बीड – पंकजा मुंडे
19. माढा रणजित नाईक निंबाळकर
20. सांगली – संजय काका पाटील