लिंक फेल आणि साईट डाऊनचा हैराणा : धानोऱ्यातील शेकडो राशनधारक त्रस्त

118

लिंक फेल आणि साईट डाऊनचा हैराणा : धानोऱ्यातील शेकडो राशनधारक त्रस्त
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १६ : धानोरा तहसील कार्यालयातील सततची “लिंक फेल” आणि “वेबसाईट बंद” ही कारणं आता सामान्य नागरिकांच्या त्रासाचे मुख्य कारण बनली आहेत. राशन कार्डातील सुधारणा, नवीन नावांची नोंदणी, कार्ड अपडेटसाठी येणाऱ्या नागरिकांना रोजच्या रोज अपयशाला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील अंत्योदय, केशरी आणि सफेद राशन कार्डधारक विविध समस्यांसह कार्यालयात येत असले, तरी कर्मचार्‍यांकडून “साईट चालू नाही” किंवा “लिंक फेल आहे” अशी उत्तरे मिळत आहेत. परिणामी ३० ते ४० किमी अंतर पार करून आलेल्या नागरिकांना काम न होता परत जावे लागत आहे.
या त्रासामुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, यामुळे संतप्त नागरिक प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत.
“लिंक सुरळीत करून राशन कार्ड सेवांचा प्रश्न कायमचा सोडवा”, अशी ठाम मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
शासनाने तातडीने लक्ष घालून या समस्येवर कायमचा उपाय शोधावा, अशी अपेक्षा धानोऱ्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #dhanora)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here