१ मे ला महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस तर्फे मुंबई येथे एल डी एम कार्यक्रम

368

The गडविश्व
गडचिरोली, ३० एप्रिल : महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसची आढावा बैठक सोमवार ०१ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता टिळक भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले , एस.सी, एस. टी, ओबीसी, व मायनोरीटी, चे राष्ट्रीय समन्वयक के राजू , अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सहप्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आशिष दुआ, राष्ट्रीय समन्वयक आदिवासी काँग्रेस के.सी. गुमारिया, काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री आमदार के.सी. पाडवी, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सहसराम कोरोटे, आमदार हिरामण कोसकर, आमदार शिरीष नाईक, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी खासदार बापूसाहेब चौरे, विदर्भ संयोजक उपजीविका मंच दिलीप गोडे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी मंत्री स्वरुपसिंग नाईक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे संघटनात्मक कार्य, आदिवासींचा सहभाग,आदिवासींचे प्रश्न, काँग्रेस पक्षाने आदिवासींसाठी केलेले कार्य, लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन (LDM) या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. व विदर्भ संयोजक उपजीविका मंच दिलीप गोडे यांचे एफ.आर.ए, पेसा या विषयांवर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हाकार्यकरणीचे सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका कार्यकारिणीचे सदस्य , आदिवासी नेते , जी.प. सदस्य, प.स. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here