कुरखेडा : दुचाकींची समोरासमोर जबर धडक, एकजण ठार

1092

– गोठणगाव- शिवणी मार्गावर अपघात
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २० मे : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार २० मे रोजी तालुक्यातील गोठणगाव-शिवणी मार्गावर सायंकाळी ७.३० वाजताच्या घडली.
लोकेश चाफा (२७) रा. चांदोना असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून जागेश्वर नेटी (२६), विक्रांत हूंडरा (२७) तिन्ही रा. चिचटोला व प्रशांत तूकाराम मारगाये (२०) व राहूल डोंगरवार (२५) रा. शिवणी अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून चार दिवसांपूर्वीच कुरखेडा येथील गोठणगाव फाट्यानाजीक उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने धडक देऊन दोघेजण ठार झाले. ही घटना ताजी असतांनाच चिचटोला येथील तिन यूवक कूरखेडा येथून स्वगावी जात असताना शिवणी येथून येत असलेल्या दुचाकींची समोरसासमोर गोठणगाव-शिवणी मार्गावर जबर धडक बसली. यात दुचाकीस्वार लोकेश चाफा चा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.
सदर अपघाताची माहिती कुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते शहेजाद हाशमी, रोशन मेश्राम, बंटी देवढगले, आपचे तालुका संयोजक ईश्वर ठाकूर यांना माहिती होताच घटनास्थळ गाठून सर्वाना रुग्णवाहिकीने उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करीत त्याना पुढील उपचाराकरिता करीता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यातआल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सततच्या अपघाताने मात्र वाहनांच्या वेगावर आवर घालणे आवश्यक आहे.
(the gdv, the gadvishva, kurkheda gothangao shivani bike accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here