कुरखेडा : आदिवासी विकास महामंडळ कडून शासकीय रब्बी धान खरेदी नोंदणीला सुरुवात

304

– नोंदणीची गती वाढवून धान्य खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची भाजप शिष्टमंडळाची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १६ : गडचिरोली जिल्हा हा धान्य उत्पादक जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादन केल्या जात आहे. कुरखेडा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रब्बी लागवड करण्यात येत असून रब्बी हंगाम जवळपास पूर्ण झाला असून शेतकरी बांधव धान खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रतीक्षा करत आहेत. आदिवासी विकास महामंडळ कुरखेडा कार्यालयात धान्य नोंदणीला सुरुवात केली नोंदणीची गती वाढवून आदिवासी विकास महामंडळाने धान्य खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी. व शेतकरी बांधवांना कुठलाही त्रास होणार नाही आणि शेतकरी बांधवांचे कुठलीही आर्थिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा शिष्टमंडळाने भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांचे नेतृत्वात व सहकारी भात गिरणीचे अध्यक्ष विनोद खुणे, भाजपाचे तालुका महामंत्री , विनोद नागपूरकर, नगरपंचायत कुरखेडा नगरसेवक सागर निरंकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोणेश मेश्राम, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंगराज कराडे, सीतकुरा गाडेगोने व शेतकरी बांधव यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात भेट देऊन उपस्थित कर्मचारी सोबत चर्चा केली.
दरवर्षी आदिवासी विकास महामंडळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून रब्बी धान्य खरेदी करतो. परंतु आधारभूत भात खरेदी खरीप हंगाम 2024- 25 मधील खरेदी केलेल्या मालाची उचल पाच महिने होऊनही झालेले नाही. सदर धान खरेदी केंद्रामध्ये उघड्यावर, शेड व गोदाम मध्ये साठवणूक करून ठेवलेला आहे.कोणत्याही संस्थेमध्ये सध्या गोदाम उपलब्ध नाही. धान्य मालाची उचल वेळेवर होत नाही. त्यामुळे अवाजवी घटीचे कारण दाखवून आदिवासी विकासमहामंडळ हे आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना कमिशन देत नाही. त्यामुळे संस्थांची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे. संस्थेला मनुष्यबळ मिळत नाही.त्यातच महामंडळाकडून मालाची उचल न करता चौकशांच्या भडीमार सुरू आहे.नुकतेच शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्ती केलेल्या पथकामार्फत सर्व खरेदी केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे. पुढेही करण्यात येत आहे. समोर उचल न झाल्यास पावसाळ्याचे दिवसात ही मोठ्या प्रमाणात धान्य सोसायटीमध्ये पडून राहिल्यास नासधूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना धान्य खरेदी करणे सुरू करणे अडचणीचे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे मागील धान्याची उचल झाल्याशिवाय धान्य खरेदी केंद्र सुरू करणार नाही. अशी भूमिका आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने घेतल्यामुळे धान खरेदी नोंदणीला व खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत आहे.
आदिवासी विकास महामंडळ आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या नाहक अडचणीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने आवश्यक ठिकाणी धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. तसेच आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यालयात असलेले धान्याची उचलही करण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, भात गिरणीचे अध्यक्ष विनोद खुणे, विनोद नागपूरकर, सागर निरंकारी, मोनेश मेश्राम, सितकुरा गाडेगोने, अंगराज कराडे व शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here