The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १३ : शिवसेना उबाठा गट व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १२ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ७.३० वाजता विजया दशमी निमित्त अहंकाराचा प्रतिक असलेल्या रावणाच्या प्रतिमेचे फटाक्यांची आतिशबाजी व विधीवत पूजन करीत दहन करण्यात आले. मागील सलग ३५ वर्षापासून हा सोहळा दरवर्षी शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहे.
सांयकाळी येथील गांधी वार्डातून वाजत गाजत राम लक्ष्मण व हनूमानाच्या वेशभूषेत असलेले बाल कलाकार सजवलेल्या रथाने सतीनदीच्या काठावर पोहचले. फटाक्यांची मोठी आतिशबाजी करीत व परंपरागत पद्धतीने पूजा अर्चणा करीत रावन दहन करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल होते तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे, शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख आशिष काळे, शहर प्रमुख संजय देशमुख, माजी सभापति पूंडलिक देशमुख, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर, सभापति अशोक कंगाले, नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल, नगरसेवीका जयश्री रासेकर, डॉ. मेघा सावसागडे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अमृत मेहर, पूंडलिक निपाने, यूवतीसेना जिल्हाप्रमूख प्रा. उमा चंदेल, गजानन भोयर, राहूल घोगरे, आतिशबाजी प्रमूख विजय पाटील पूस्तोडे, राकेश चव्हाण, पूरषोत्तम तिरगम, देवेन्द्र मेश्राम, प्रभू शिवलवार, हेमंत चंदनखेडे, शंकर कलहारी, अस्सू शेख तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तालूक्यातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #14octobar #dasra #gadchirolilocalnews #gadchiroliforest #gadchirolicollector #dhamchakrparivartandin)