The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), २८ सप्टेंबर : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील कार्यरत असलेल्या अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत दिनांक २० त २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत चार दिवसीय रोबोटिक्स व आर्टीफिशल इंटेलिजन् कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
रोबोटिक्स व आर्टीफिशल इंटेलिजन्स ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. २१ वे शतक हे फक्त रोबोटिक्स व आर्टीफिशल इंटेलिजन्स चे युग म्हणून लक्षात ठेवले जाईल असे प्रतिपादन कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी केले. तसेच हैदराबाद येथील सर्वा लॅब कंपनीचे संस्थापक तथा इंजिनिअर साई कृष्णा मोरा या चार दिवसीय रोबोटिक्स व आर्टीफिशल इंटेलिजन्स कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनात वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्सचे प्रोजेक्ट्स तयार केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक उद्धव वाघाडे व महेंद्र नवघडे उपस्थित होते. रोबोटिक्स व आर्टीफिशल इंटेलिजन्स कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी अटल टिंकरिंग लॅबचे समन्वयक लिकेश कोडापे व समस्त प्राध्यापक शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थीत होते.