कुरखेडा : मुनघाटे कॉलेजला ‘वन स्टार इनोव्हेशन’

213

– सलग दुसऱ्यांदा नामांकन मिळविणारे महाविद्यालय
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाला भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाद्वारे इनोव्हेशन कौन्सिलतर्फे ‘वन स्टार’ नामांकन प्राप्त झाले आहे. श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे व प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी नॅशनल इनोव्हेशन ॲन्ड स्टार्टअप पॉलिसी, विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी उजळणी वर्ग, प्रश्नमंजुषा, वाचन व व्यक्तिमत्व विकास यावर कार्यशाळा सायबर सिक्युरिटी, राष्ट्रीय ऊर्जा बचत, ई-कॉमर्स, फूड टेक्नॉलॉजी, केंद्र सरकारच्या नवोपक्रम व नवउद्योजकांना प्रशिक्षण, पेटंटचे विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशिक्षण, भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योजक मंत्रालयाचे जितेंद्र चौरे यांचे आयपीआरवर राष्ट्रीय कार्यशाळा, इतर राष्ट्रीय स्तरावरची विज्ञान प्रश्नमंजुषा, जागतिक वसुंधरा दिन, आधुनिक कृषी पद्धती आदी विविध उपक्रमांचे महाविद्यालयाच्या आयआयसी केंद्राच्या सहाय्याने आभासी पद्धतीने आयोजन करण्यात आलेले होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना या सेलद्वारे इनोव्हेशन अम्बेसेटर्सचे प्रशिक्षण मिळालेले आहे. या सर्व उपक्रमांचा फायदा परिसरातील विद्यार्थ्यांना लघु उद्योजकांना, उद्योजकानी, रोजगार निर्मिती व परिसरातील बेरोजगारांना आत्मनिर्भर बनण्यासाठी होणार आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात एक स्टार नामांकन प्राप्त झालेले होते. त्यानंतर सतत दुसऱ्यांदा २०२१-२२ या वर्षात ‘वन स्टार नामांकन प्राप्त झाले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात प्रतिष्ठेचे नामांकन प्राप्त करणारे मुनघाटे महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे. सदर प्राप्त नामांकनाने डॉ. राजाभाऊ मुनघाटे, आयआयसि सेल प्रमुख उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे व संपूर्ण चमूचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Kurkheda) (Kurkheda: ‘One Star Innovation’ to Munghate College)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here