कुरखेडा : रन फॉर युनिटी मॅरेथॉन च्या माध्यमातून राष्ट्रीय एकता दिनाचा संदेश
– उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तथा कुरखेडा पोलीस स्टेशन कुरखेडा यांचा संयुक्त उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत पोलीस स्मृतिदिन व राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून, भारतीय एकतेचे शिल्पकार आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी मॅरेथॉन’ चे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कुरखेडा तसेच पोलीस स्टेशन कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
आज सकाळी ७ वाजता वनपरिक्षेत्र कार्यालयासमोरील रस्त्यावरून मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत कुरखेडा तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांसह पोलीस विभागातील अधिकारी-अंमलदार तसेच विविध शासकीय विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मॅरेथॉनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, सागर निरंकारी, प्रा. विनोद नागपूरकर, उल्हास देशमुख यांच्यासह अनेक नागरिक, युवक व युवतींनी उत्साहाने धावत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
‘रन फॉर युनिटी मॅरेथॉन’च्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन कुरखेडा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी बांधवांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाद्वारे एकता, अखंडता आणि बंधुभावाचा संदेश संपूर्ण कुरखेडा शहरात झळकला.
#thegdv #thegadvishva #RunForUnity #EktaDiwas #GadchiroliPolice #KurKheda #SardarPatel150














