कुरखेडा : पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी

741

– अवैध कामाचे वृत्तांकन केल्याने केली शिवीगाळ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १३ जून : तालुक्यातील कुंभिटोला गावालगत असलेल्या सती नदी पत्रातुन होत असलेल्या अवैध रेती उपसा संबंधी वृत्तांकन करून प्रकाशित केल्याने स्थानिक पत्रकारांना कुंभिटोला येथील देवानंद नाकाडे या इसमाने घरासमोर जाऊन संपूर्ण पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सदर बाब लक्षात घेता कुरखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या विरोधात विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार पोलीस ठाणे कुरखेडा येथे मंगळवार १३ जून रोजी दाखल करण्यात आली आहे.
कुरखेडा तालुका विविध समस्येने ग्रासलेला आहे. तालुक्यातील पत्रकार विविध समस्यांना आपल्या लेखणीतून उजागर करीत आहे. तालुक्यातील कुंभिटोला गावालगत असलेली अवैध विटा भट्टी व गावालगतच्या सती नदी पत्रातून होत असलेली अवैध रेती चोरी याबाबत स्थानिक पत्रकारांनी आपल्या लेखणीतून प्रकरण उजेडात आणत प्रकाशित केली. दोन दिवसांपूर्वी तहसीलदार यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत एकाच रात्री तीन ट्रॅक्टरवर कारवाई केली. सदर कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले असतांना कुंभिटोला येथील देवानंद रेवनाथ नाकाडे हा व्यक्ती स्थानिक पत्रकारांच्या घरासमोर जाऊन संपूर्ण पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केला. तसेच मारण्याची धमकी देऊ लागला. सदर बाब निंदनीय असून पत्रकारांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे देवानंद नाकाडे यावर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार कुरखेडा तालुका पत्रकार संघातर्फे पोलीस ठाणे कुरखेडा येथे दाखल करण्यात आली आहे. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठाण, सचिव नसीर हाशमी, उपाध्यक्ष विजय भैसारे, सहसचिव विनोद नागपूरकर, सदस्य शिवा भोयर, ताहीर शेख, कृष्णा चौधरी, महेंद्र लाडे, सूरज गावतुरे, चेतन गाहाने प्रामुख्याने उपस्थित होते.

यापूर्वीही अशाप्रकारची धमकी, NCR दाखल

कुंभिटोला येथे सुरू असलेल्या अवैध विटाभट्टी चे चित्रीकरण करून वृत्तांकन केल्या प्रकरणी यापूर्वी देवानंद नाकाडे यांने पत्रकाराच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करत जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली होती. कुरखेडा पोलीस ठाण्यात त्याविरुद्ध NCR दाखल करण्यात आला होता.
तसेच देसाईगंज तालुक्यातील कोंढाळ घाटावरून रेती तस्करी बाबत वृत्त प्रकाशीत करून प्रकरण उजेडात आणल्याने कोंढाळा येथील पत्रकाराला सुद्धा रेती तस्करांकडून शिवीगाळ व धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. तेव्हा देसाईगंज पोलीस ठाण्यात सुदधा NCR दाखल करण्यात आला होता.

(the gdv, the gadvishva, kurkheda, gadchiroli, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here