कुरखेडा : अवैध दारू तस्करीच्या वाहनाची अज्ञाताकडून जाळपोळ, पोलीस प्रशासन अनभिज्ञ

996

– अवैध दारू तस्करांचे दणाणले धाबे
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ४ जून : अवैध दारू तस्करी करणाऱ्या वाहनाची अज्ञातांनी जाळपोळ केल्याची धक्कदायक घटना कुरखेडा तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या गांधीनगर टी पाईंटवर मध्यरात्रोच्या सुमारास घडल्याची बाब पुढे येत आहे. मात्र एवढी मोठी घटना घडूनही सदर घटनेबाबत कुरखेडा पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर सादर घटनेनंतर अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
गडचिरोली जिल्हयात दारूबंदी असतांना मोठया प्रमाणात शेजारच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हयातून तसेच छत्तीसगढ राज्यातून छुप्या मार्गाने दारूची तस्करी होत असते. हे अवैध तस्करी रात्रोच्या सुमारास आपला खेळ चालवत असतात. पोलीस अधीक्षक नीलोत्पल हे नव्याने रुजू झाल्यापासून अवैध धंद्यांवर होणाऱ्या कारवाईत वाढ झाली आहे. कुरखेडा तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या गांधीनगर टी पाईंट वर अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास चक्क दारू तस्करी होत असलेले वाहन दारूसह जाळल्याची खळबळजनक माहिती पुढे आली असून तालुकाभर या जाळपोळीची चर्चा असतांना मात्र पोलीस प्रशासन या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते. सदर घटनेसंदर्भात कुरखेडा पोलीस ठाण्यात संपर्क करून विचारणा केली असता अशाप्रकरची कोणतीही घटना घडली नाही व तशी माहिती पोलीस ठाण्याला नोंद करण्यात आली नसल्याचे The गडविश्व शी बोलतांना सांगितले. अवैध दारू तस्करी असल्याने सदर घटनेबाबत दारू तस्करांनीही या घटनेबाबत पोलीस प्रशासनासह इतरांशी मौन बाळगले असल्याचे कळते.
ऐरवी एखादया घटनेत नुकसान झाल्यास पोलीस प्रशासनाला कळविले जाते मात्र या घटनेसंदर्भात तसे होतांना दिसत नाही. सदर जाळपोळ करण्यात आलेली चारचाकी वाहन ही एका कबाडीच्या दुकानात आढळुन आल्याचेही कळते. एवढे सर्व असतांना तालुक्यात काय घडतेय याबाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असुन कुरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होत अशी माहिती आहे त्यामुळे सदर घटनेबाबत पोलीस प्रशासनाने गोपनियता तर बाळगली नाही असा सवाल उपस्थित होत आहे. पुढे काय कारवाई होत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घटनेवर प्रश्नचिन्ह ?

तालुका मुख्यालय नजीक अशाप्रकारची जाळपोळीची घटना घडली मात्र या घटनेबाबत पोलीस प्रशासनाला माहिती नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संपूर्ण तालुक्यात घटनेसंदर्भात चर्चा सुरु आहे मात्र पोलीस अनभिज्ञ आहेत. पोलीस प्रशासन अवैध दारू तस्करीवर अंकुश लावण्यात असमर्थ तर नाही त्यामुळे त्रस्त असलेल्या अज्ञाताने तर हि जाळपोळ केली नसावी असा देखील सवाल उपस्थित होत आहे.ⒸⒸⒸ
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, crime news, kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here