-कुरखेडा येथे मुक्तिपथ तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : कुरखेडा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार अध्यक्ष कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तिपथ तालुका समितीची बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील अवैध दारू व तंबाखूविक्रीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये पोलीस विभाग, नगरपंचायत विभाग, पंचायत समिती विभाग, शिक्षण विभाग, गुरुदेव सेवा मंडळ, महाविद्यालयाचे एनएसएस प्रमुख, NTCP , फॉरेस्ट विभाग, मुक्तीपथ टीम, तहसील कार्यालय, उमेद यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील अवैध दारु व तंबाखूचे प्रमाण कमी करण्यासाठी विवीध मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये येणारी पिढी व्यसनापासून वाचवणे उद्देशाने तंबाखूमुक्त शाळा, शाळेचा परिसराच्या शंभर यार्ड परिसरामध्ये कुठलेही तंबाखूजन्य पदार्थ विक्री होणार नाही. कार्यालय प्रमुखांनी मुक्तीपथ टीमला बोलावल्यास टीम द्वारा दारुमुक्त कार्यालय कार्यशाळा घेतली जाईल. तहसील कार्यालयाच्या 100 यार्ड परिसरामध्ये कुठलेही तंबाखूजन्य विक्री होणार नाही तसेच एक भरारी पथकाच्या माध्यमातून कोटपा कायद्याअंतर्गत दर महिन्याला कारवाई होईल. शाळा आणि कॉलेजमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन प्रेम-आकर्षण आणि व्यसनावर मार्गदर्शन करण्यात येईल, गाव पातळीवरील अवैध दारूविक्री बंदीसाठी गावातील बचत गट, ग्रामपंचायत समिती व गावातील महिलांनी पुढाकार घ्यावा. आदी विषय सभेत मांडण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )